Skip to content Skip to footer

अहमदनगर जिल्हा नियोजन समिती सोडवणार जिल्ह्यातील पाणी व रस्ते प्रश्न..!

आज अहमदनगर येथे पालकमंत्री मा. हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली “जिल्हा नियोजन समिती” तर्फे आयोजित केलेली विशेष बैठक पार पडली. जिल्ह्यातील पाणी व रस्त्यांचा प्रश्न तसेच सौरऊर्जा प्रकल्प याविषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. सदर बैठकीमध्ये अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून, जिल्ह्यातील विकासकामांना चालना देण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देखील करण्यात आल्या. बैठकी दरम्यान बोलत असताना जिल्ह्यातील नागरिकांना त्रासदायक ठरणाऱ्या गोष्टींवर विशेष लक्ष केंद्रित करून त्याबाबतीत कामे शीघ्रगतीने करण्याचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी सुचवले. जिल्ह्यातील नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करत असतानाच सौरऊर्जेच्या वापराबद्दल व संबंधित क्षेत्रात नवीन प्रकल्प उभारण्याबाबतीत चर्चा करण्यात आली. वाढती लोकसंख्या व पारंपारिक ऊर्जा स्त्रोतांची वाढत जाणारी मागणी लक्षात घेता अपारंपारिक ऊर्जेचा वापर करणे काळाची गरज आहे आणि या स्रोतांचा पुरेपूर उपयोग करण्यासाठी खा. डॉ. सुजय विखे शक्य ते प्रयत्न करत आहेत.

01\ Ahmednagar-district-planning-par

याप्रसंगी पालकमंत्री मा. हसन मुश्रीफ, नगरविकास व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खा. डॉ. सुजय विखे, खा. सदाशिव लोखंडे, जिल्हाधिकारी राहुल त्रिवेदी, जिल्ह्यातील सर्व माननीय आमदार, जिल्हा नियोजन समितीचे पदाधिकारी, अधिकारी यांची या प्रसंगी उपस्थिती होती. जिल्हा नियोजन समिती सर्व क्षेत्रातील अधिकारी व नेतेमंडळींना सोबत घेऊन विकासासाठी लक्षणीय कार्य करत आहे.

Leave a comment

0.0/5