Skip to content Skip to footer

युवासेना मॉक सीईटीच्या पोस्टर व संकेतस्थळ (Website) चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण  

युवासेना मॉक सीईटीच्या पोस्टर व संकेतस्थळ (Website) चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण    

              युवासेना मॉक सीईटीच्या पोस्टर व वेबसाईटचे अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालय येथे पार पडले. मागील चार वर्षांपासून युवासेनेच्या माध्यमातून इंजिनीयरिंग, मेडिकल, फार्मसी आणि लॉ अभ्यासक्रमाच्या सराव परीक्षांचे वर्ग युवासेनेच्या माध्यमातून चालवले जात आहेत. ही परीक्षा महाराष्ट्रातील प्रत्येक तालुका आणि शहरात होणार असून प्रत्येक विद्यार्थ्यांस मॉडल सोल्युशन सेट आणि रिजल्ट ॲनलिसीस उपलब्ध करुन दिले जाणार आहेत.

                 आज खाजगी क्लासेस तर्फे चालवल्या जाणाऱ्या या सराव परीक्षेची फीस अवाढव्य असून ही फी सर्व सामान्य विद्यार्थ्यांना न परवडणारीच असते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे परीक्षेत हवे तेवढे यश त्यांना संपादन करता येत नाही. ह्या सराव परीक्षा उपक्रमाद्वारे युवासेनेच्या माध्यमातून तज्ञ शिक्षकांकडून मिळणारे योग्य मार्गदर्शन आणि अभ्यासासाठी पूरक अशी पुस्तके दिली जात असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना इंजिनीयरिंग, मेडिकल, फार्मसीच्या पूर्व परीक्षेला हवे तसे यश संपादन करण्यात मोलाचा हातभार लागतो.

सदर सराव परीक्षा रविवार, 29 मार्च 2020 होणार असून त्यासाठी पूर्व नोंदणी अनिवार्य आहे.

पूर्व नोंदणी तसेच ह्याबद्दल अधिक माहिती ‘www.yuvasenacet.com’ ह्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे युवासेनेच्या प्रतिनिधींकडुन सांगण्यात आले.

Leave a comment

0.0/5