Skip to content Skip to footer

मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नाने सिंगापूरमध्ये अडकलेले ५० विदयार्थी मायदेशी परतले…

मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नाने सिंगापूरमध्ये अडकलेले ५० विदयार्थी मायदेशी परतले…

देशात आणि राज्यात वाढत्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जगातील सर्वच देशासाठी भारताची दारे बंद केलेली आहे. या घेतलेल्या निर्णयामुळे इतर देशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना पुन्हा आपल्या मायदेशी परतण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. कोरोना हा विदेशातून आलेला संसर्गजन्य आजार आहे. यावर अद्याप ठोस अशी उपचार पद्धती विकसीत नाही. त्यामुळे विदेशातून भारतात येणा-या नागरिकांमुळे या विषाणूचा फैलाव भारतात झाला आहे.

केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचा फटका फिलिपीन्समध्ये शिकणाऱ्या ५० भारतीय विद्यार्थ्यांना बसला आहे. भारतात येण्यासाठी निघालेल्या या विद्यार्थ्यांना सिंगापूर विमानतळावर रोखण्यात आले. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठपुराव्यानंतर अखेर ते ५० विद्यार्थी भारतात परतले आहेत. या विद्यार्थ्यांपैकी काहींना सध्या सेव्हन हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर मुंबईतील विद्यार्थ्यांना पुढील १४ दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

हे विद्यार्थी सिंगापूर विमानतळावर अडकले होते. सिंगापूरहून एअर इंडियाच्या विमानाने ते भारतात दाखल होणार होते. मात्र, सिंगापूर सरकारच्या आदेशानुसार, या विद्यार्थ्यांना सिंगापूरहून भारतात पाठविता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. सिंगापूरमध्ये अडकलेल्या ५० विद्यार्थ्यांना मुंबईत सुखरुप आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः सिंगापूर मधील भारतीय दूतावासाशी संपर्कात होते. आता हे ५० विध्यार्थी मायदेशी परतले आहे.

Leave a comment

0.0/5