Skip to content Skip to footer

तुकोबांच्या पादुका मार्गस्थ ! – फुलमाळांनी सजवलेली ‘लालपरी’ ठरली वाहक.

तुकोबांच्या पादुका मार्गस्थ ! – फुलमाळांनी सजवलेली ‘लालपरी’ ठरली वाहक.

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रातून विविध ठिकाणांहून वारकरी पंढरपुरात वारी करत येत असतात. विठुरायाच्या नामघोष करत वारकरी पंढपूरच्या दिशेने येत असतात. परंतु यंदा कोरोनाच्या संसर्गामुळे ही वारी रद्द करण्याचे आदेश राज्यसरकारने दिले होते. त्यानुसार वारकऱ्यांना पंढरपुरात येण्यास, वारी करण्यास व एकूणच दर्शनासही गर्दी न करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्या आवाहनाला मनावर दगड ठेवून असंख्य विठू रखुमाई भक्तांनी घरी राहूनच विठुरायाचे दर्शन करायचे ठरविले.

तसेच कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव व राज्य सरकारचे नियम यामुळे तुकोबारायांच्या पादुका देखील पारंपरिक रथातून न नेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावर महाराष्ट्र शासनाने व परिवहन विभागाने विशेष लक्ष देत तुकोबारायांच्या पादुका पंढरपूरपर्यंत पोहचविण्यासाठी नियोजन केले आहे. यंदा तुकोबांच्या पादुका पारंपरिक रथाऐवजी फुलमाळांनी सजवलेल्या सुंदर व आपल्या लाडक्या “लालपरी” तुन पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत.

Leave a comment

0.0/5