Skip to content Skip to footer

आणखी तीन महिने मिळणार पाच रुपयात शिवभोजन थाळी

आणखी तीन महिने मिळणार पाच रुपयात शिवभोजन थाळी

             सध्या लॉकडाऊन संपलेला असला तरी गरीब, कष्टकरी आणि हातावरचे पोट असलेल्या व्यक्तींच्या हाताला काम मिळलेले नाही. त्यामुळे अजूनही त्यांचा दोन वेळेच्या जेवणाचा प्रश्न सुटलेला नाही. याच पार्श्वभूमीवर आणखी तीन महिने ५ रुपयामध्ये शिवभोजन थाळी योजना सुरु ठेवण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतलेला आहे.
       

          या निर्णयामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कोरोनाच्या संकटात सर्वत्र काम-धंदे बंद पडल्यामुळे राज्यातील गरीब, गरजू, विध्यार्थी आणि हातावरचे पोट असलेला सामान्य नागरिक उपाशी राहू नये म्हणून राज्य सरकारने मार्च महिन्यातच ही योजना प्रत्येक जिल्ह्यात सुरु केली होती.

           तसेच तालुकास्थरावर सुद्धा शिवभोजन थाळीचा विस्तार करण्यात आला होता. तसेच प्रत्येक जिल्ह्यात पाचपट शिवभोजन  थाळीची संख्या सुद्धा वाढवण्यात आली होती त्यासाठी अनुदान म्हणून शहरी भागासाठी प्रति थाळी ४५ रुपये आणि ग्रामीण भागासाठी प्रति थाळी ३० रुपये शासन देणार आहे. यासाठी शासनाने १६० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

Leave a comment

0.0/5