Skip to content Skip to footer

मुंबई मनपाची भन्नाट आयडिया, पायाने बटन दाबा लिफ्ट चालवा…!

मुंबई मनपाची भन्नाट आयडिया, पायाने बटन दाबा लिफ्ट चालवा…!

           साध्य मुंबईत झपाटाने कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे मुंबई मनपा विविध उपाययोजनांचा अवलंब करत कोरोना संसर्गला रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. यातच मुंबई मनपाने लिफ्ट मधून होणारा संसर्ग रोखण्यासाठी एक भन्नाट आयडिया शोधून काढली आहे.

       कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग रोखण्यासाठी लिफ्ट हाताच्या बोटांनी स्पर्श न करता चालवण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. लिफ्टमध्ये कोरोना संसर्गाची भीती लक्षात घेता महापालिकेच्या जी-दक्षिण आणि एम-पश्चिम विभाग कार्यालयांमधील लिफ्टमध्ये प्रायोगिक तत्वावर पायाने बटण दाबून चालवण्याची व्यवस्था केली आहे. महापालिकेने ओमटेक कंपनीच्या माध्यमातून ही संकल्पना राबवली आहे.

Leave a comment

0.0/5