Skip to content Skip to footer

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले बारावीच्या विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले बारावीच्या विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन

              महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बाबारावी परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. या निकालात पुन्हा एकदा कोकण विभागाने बाजी मारलेली आहे. पुन्हा एकदा कोकण विभागाने आपले अव्वल स्थान टिकवण्याची परंपरा कायम राखली आहे.
             कोकणचा निकाल ९५.८९ टक्के इतका लागला आहे. तर राज्याचा एकूण निकाल ९०.६६ टक्के लागला आहे. यात पुन्हा एकदा राज्यतील मुलींनी बाजी मारली आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे.
            अभिनंदन संदेशात मुख्यमंत्री म्हणतात की, बारावीच्या परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो, तो तुम्ही यशस्वीपणे पार पाडला यासाठी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन! एकदा तुम्ही ठरवले की तुम्ही साध्य करू शकत नाही असे काहीही नाही. ज्या विद्यार्थ्यांच्या अपेक्षेप्रमाणे निकाल लागला नाही, त्यांनी खचून जायची गरज नाही. आयुष्यातील सर्वच टप्प्यांवर आपण यशस्वी होतो असे नाही आणि एक परीक्षा आपले भविष्य ठरवत नाही. तुम्ही सर्व समृध्द महाराष्ट्राचा कणा आहात. सर्वांना उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा!

Leave a comment

0.0/5