Skip to content Skip to footer

नवी दिल्ली : विजय मल्ल्या प्रकरणातील काही महत्वाची कागदपत्रे गायब….!

नवी दिल्ली : विजय मल्ल्या प्रकरणातील काही महत्वाची कागदपत्रे गायब….!

अनेक बँकांना हजारो कोटींचा चुना लावून विदेशात पळालेल्या किंगफिशर कंपनीचे मालक विजय मल्ल्या यांच्या खटल्यातील काही गोपनीय माहिती असलेले कागदपत्र गायब झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्या खटल्यातील कागदपत्रे गायब झाल्यामुळे न्यायालयाने विजय मल्ल्या प्रकरणातील सुनवाई टाळलेली आहे.

सर्वोच्च न्यालयाच्या निर्णयाचे उल्लघंन केल्याचा आरोप मल्ल्यावर लावण्यात आलेला आहे. यावर मल्ल्याने पुर्नविचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. मात्र कागदपत्रे गायब झाल्याचे निर्देशानास आल्यानंतर पुढील सुनवाईची तारीख २० ऑगस्ट देण्यात आलेली आहे.

आज अनेक बँकांचे कर्ज बुडवून विदेशात स्थायिक झालेल्या विजय मल्ल्याच्या प्रकरणातील कागदपत्रे कशी काय गायब होऊ शकतात?, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. मात्र या कागदपत्रांसोबत अनेकांची नावे बाहेर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे सुद्धा आता बोलले जात आहे.

Leave a comment

0.0/5