Skip to content Skip to footer

चर्मकार समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी शिवसेना चर्मोद्योग कामगार सेना अध्यक्ष मयूर कांबळे यांनी घेतली मंत्री धनंजय मुंडे यांची भेट…..!

चर्मकार समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी शिवसेना चर्मोद्योग कामगार सेना अध्यक्ष मयूर कांबळे यांनी घेतली मंत्री धनंजय मुंडे यांची भेट…..!

सध्या चर्मकार समाजाच्या अनेक मागण्या या प्रलंबित स्वरूपात आहेत. या मागण्या पूर्ण करण्यासाठी आणि यावर चर्चा करण्यासाठी शिवसेना चर्मोद्योग कामगार सेना अध्यक्ष मयुर कांबळे यांनी आज सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेऊन आपल्या विविध मागण्यांचे पत्र मंत्री महोदयांना सुपूर्त केले.
यावेळी मंत्री महोदयांनी या सर्व मागण्याचा विचार करून वरील समस्यांवर योग्य ती उपाययोजना केली जाईल व आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन मंत्री महोदयांनी शिवसेना चर्मोद्योग कामगार सेना अध्यक्ष मयुर कांबळे यांना दिले आहे.

शिवसेना चर्मोद्योग कामगार सेना अध्यक्ष मयूर कांबळे यांनी मांडलेले मुद्दे…..!

१) जातीनिहाय व्यवस्थेनुसार वर्षानुवर्षे रस्त्याच्या कडेला बसून ‘अत्यावश्यक सेवक’ म्हणून अत्यअल्प मोबदल्यात चप्पल दुरूस्ती व चप्पल विक्रीचे काम करणाऱ्या चर्मकार समाजाच्या गटई कामगाराचे तो काम करीत असलेल्या हद्दीतील नगरपरीषद, महानगरपालिका यांच्या मार्फत सर्वेक्षण करण्यात यावे.

२) संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या देवनार येथील जागेवर प्रधान कार्यालयाची इमारत उभारणे कामी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याशी समन्वय साधावा

३) सन २०१२ पासून चर्मकार समाजाच्या अर्जदारांना संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत कर्ज मिळणे दुर्लभ झाली आहेत. राखीव प्रवर्गासाठी उपलब्ध असलेला निधी अर्जदारांना मिळावा याकरीता वित्त विभागाचे सचिव यांच्याकडे पाठपुरावा करून राखीव प्रवर्गास निधी मिळावा याकरीता सहकार्य करावे.

Leave a comment

0.0/5