Skip to content Skip to footer

मंत्री अनिल परब यांचा नारायण राणे यांना टोला……!

भाजपा नेते, खासदार नारायण राणे मागील अनेक दिवपासून महाविकास आघाडीवर जोरदार टीका करताना दिसून येत आहे. त्यातच त्यांनी महाविकास आघाडीचे सरकार येत्या ऑगस्ट महिन्यात पडले अशी भविष्यवाणी केली होती. मात्र अजूनही आघाडी सरकार स्थिर आहे. आता त्यांच्या या वक्तव्याचा परिवहन मंत्री अनिल परब यांनी खरपूस समाचार घेतला आहे.

“भाजप नेते नारायण राणे यांना काहीच काम नसल्यामुळे त्यांनी भविष्य सांगण्याचा धंदा सुरु केला आहे. हे मला माहिती नव्हते, त्यांना या धंद्यासाठी शुभेच्छा,” असे वक्तव्य परिवहनमंत्री अनिल परब यांनी केले आहे ते आज कणकवली सिंधुदुर्ग येथे पत्रकार माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी राणेंना उपरोक्त टोला हाणला आहे.

परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज सिंधुदुर्ग एसटी डेपो आगाराची पाहणी केली तसेच येणाऱ्या दिवसात पुन्हा या आगाराला पुर्नजीवित करण्यासाठी उपाययोजना राबवणार असे सुद्धा त्यांनी बोलून दाखविले होते. तसेच स्वतः एसटीमध्ये चढून गाडीची पाहणी सुद्धा परिवहन मंत्र्यांनी केली होती.

Leave a comment

0.0/5