Skip to content Skip to footer

‘जे आडवे गेले त्यांना पूर्ण आडवे केले’, खडसेंचा स्वपक्षीय नेत्यांना टोला.

‘जे आडवे गेले त्यांना पूर्ण आडवे केले’, खडसेंचा स्वपक्षीय नेत्यांना टोला.

भाजपा नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा पक्षातील आपल्याच सहकार्यांवरच टीका केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपा मधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. महाराष्ट्रात सरकार आले असते मात्र पक्षातील काही नेत्यांच्या प्रवृत्तीमुळे सरकार येऊ शकले नाही ओबीसी बहुजनांवर अन्यायाचे धोरण भाजपाने घेतले तसेच बहुजन नेत्यांची तिकिटे कापली, असे आरोप खडसे यांनी केले होते.

“जे आडवे आले त्यांना पूर्णपणे आडवे करण्याचे काम यांनी या विधानसभा निवडणुकीत केले”, या शब्दात खडसे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. “मी ४० वर्षांपैकी अनेक वर्ष विरोधाचे काम केले आहे त्यामुळे माझा स्वभाव असाच आहे”, असे देखील ते म्हणाले. एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना ते म्हणाले की, “माझं तिकीट कापलं, बावनकुळे यांचं तिकीट कापलं, माझ्या मुलीला पाडण्यासाठी प्रयत्न केले गेले याचे पुरावे मी पक्षाला दिले आहेत. मात्र कारवाही झाली नाही!”

“मी चाळीस वर्षांपासून पक्षासाठी काम केले आहे. १० ते १२ वर्षांपूर्वी आलेले नेते आम्हाला राजकारणातील अक्कल शिकवण्याचे काम करत आहे. पक्षाने माझ्यावर जो अन्याय केला आहे त्याचा संताप कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्याचा स्फोट कधी होईल हे सांगता येणार नाही”, असे एकनाथ खडसे यांनी नाव न घेता फडणवीसांवर टीकास्त्र सोडले आहे.

Leave a comment

0.0/5