Skip to content Skip to footer

आघाडी सरकार पाडण्यात भाजपाला कधी यश मिळणार नाही – शरद पवार

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून विरोधक सतत टिका करून आघाडीच्या अडचणी वाढवण्याचे काम करत आहे. तसेच सरकार पडण्याच्या नव्या-नव्या तारखा विरोधकांकडून सांगितल्या जात आहे. आता यावर खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी भाष्य केले आहे.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना कधीच यश मिळणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थिर असून ठाकरे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.

शरद पवार यांनी भाजपवर टीका करताना म्हटलं, “आधी त्यांना दोन महिन्यात ठाकरे सरकार पाडायचं होतं. नंतर सहा महिन्यात सरकार पाडणार होते. नंतर पुन्हा आठ महिन्यात सरकार पाडणार होते. पण काहीच झाले नाही. उलट ठाकरे सरकारने एक वर्षही पूर्ण केले आहे. सरकार स्थिर असून आपला कार्यकालही पूर्ण करेल.

Leave a comment

0.0/5