Skip to content Skip to footer

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी पश्चिम रेल्वे आता पूर्ण क्षमतेने धावणार

कोरोना संसर्गच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली मुंबई लोकल सेवा लवकरच सर्वसामान्यांसाठी सुरु केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. येत्या २९ जानेवारीपासून पश्चिम रेल्वे सेवा पूर्ववत सुरु केली जाणार आहे. पण यात केवळ रेल्वे आणि महाराष्ट्र सरकारने परवानगी दिलेल्या लोकांना प्रवास करता येणार आहे. मात्र सर्वसामान्यांना प्रवासासाठी अद्याप वेट अँड वॉच करावं लागणार आहे. नुकतंच पश्चिम रेल्वेने याबाबतची माहिती दिली आहे.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, येत्या शुक्रवारी २९ जानेवारीपासून पश्चिम रेल्वेच्या सर्व लोकल रुळावर धावणार आहेत. सध्या पश्चिम रेल्वेकडून दिवसाला १२०१ फेऱ्या चालवल्या जात आहेत. मात्र, आता त्यामध्ये १६६ फेऱ्यांची भर पडून पश्चिम रेल्वेवर पूर्ण क्षमतेने म्हणजे १३६७ फेऱ्या चालवल्या जाणार आहे.

सोमवारीच मुंबईतील उपनगरीय लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली एक आढावा बैठक घेण्यात आली होती. करोना विषाणूचा प्रादुर्भाव अजून संपला नसल्याने गर्दी होणार नाही, अशा पद्धतीने लोकल सेवा सर्वांसाठी कशाप्रकारे सुरू करता येऊ शकते, यादृष्टीने विविध पर्यायांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर लोकल सर्वांसाठी सुरू करण्यासंदर्भात निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले होते.

Leave a comment

0.0/5