Skip to content Skip to footer

“अमित शहांचं महाविकास आघाडीबाबतचं वक्तव्य वैफल्यातून.” – हसन मुश्रीफ.

भाजप खासदार नारायण राणे यांच्या कणकवली येथील ‘लाईफटाईम वैद्यकीय महाविद्यालया’च्या उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी सिंधुदुर्गमध्ये आले होते. यावेळी शहा यांनी शिवसेना आणि आघाडी सरकारवर जोरदार टीका केली होती आता या टीकेचा राष्ट्रवादी पक्षाचे नेते आणि कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांनी खरपूस समाचार घेतला आहे.

मुश्रीफ म्हणाले की, “अमित शहा यांनी महाविकास आघाडीबाबत केलेले वक्तव्य हे वैफल्यातून आले आहे. भाजप सत्तेवर येणार नाही, हे समजल्यामुळेच ते आता तक्रारी करत आहेत. अमित शहा यांनी आरोप केला आहे की, भाजपच्या कारखानदारांना सरकारकडून त्रास दिला जात आहे, परंतु तो आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. त्यांनी अभ्यास करून बोलायला हवं होतं. त्यांना अपूर्ण माहिती मिळाली आहे. सरकारने सगळ्याच कारखानदारांना थक हमी दिली आहे.”

पुढे बोलताना मुशीरफ म्हणाले की, “कोणतीही गटबाजी केलेली नाही. भाजपाच्या एका तरी कारखानदाराने सांगावं की त्यांना त्रास दिला जातो, आम्ही कोणतीही शिक्षा भोगायला तयार आहोत. कदाचित त्या कारखानदारांना अमित शहा यांच्याकडून पैसे घ्यायचे असतील, म्हणूनच त्यांनी हा बेबनाव सुरु केला आहे.” असा टोला त्यांनी लगावला होता.

Leave a comment

0.0/5