Skip to content Skip to footer

“भाजपच्या ‘झांसी की रानी’ चे पितळ उघडे पडले! महाराष्ट्रद्रोही भाजपने जनतेची माफी मागावी.” – सचिन सावंत.

खार येथील राहत्या घरावर बृहनमुंबई महानगर पालिकेने केलेल्या कारवाई विरोधात मुंबई हायकोर्टात कंगनाने याचिका दाखल केली होती. मात्र अखेर तिने आपली याचिका मागे घेतली आहे. यावरून आता काँग्रेस मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी पुन्हा एकदा अभिनेत्री कंगना राणावत आणि तिच्या बाजूने बोलणाऱ्या भाजपला टोला लगावला आहे.

महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या कंगना समर्थक आणि महाराष्ट्र द्रोही भाजप नेत्यांनी आता महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली पाहिजे असे ट्विट त्यांनी केले आहे. कंगनाच्या खार येथील घरातील बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी मुंबई मनपाने नोटीस बजावली होती. या विरोधात तिने हायकोर्टात धाव घेतली होती.

पुढे ट्विटमध्ये सावंत म्हणतात की, “भाजपच्या ‘झांसी की रानी’ चे पितळ उघडे पडले! महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या भाजप नेत्यांनी बेकायदा बांधकामाला ही पाठिंबा दिला. महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या कंगना समर्थक आणि महाराष्ट्र द्रोही भाजप नेत्यांनी आता महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली पाहिजे.” असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.

Leave a comment

0.0/5