Skip to content Skip to footer

एकनाथ खडसे यांना पुन्हा कोरोनाची लागण तर रक्षा खडसे सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह.

 

राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. खडसे यांना यापूर्वी दोन वेळा कोरोना सदृश लक्षणे आढळून आली होती. तसेच त्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र आता पुन्हा एकदा त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे.

तसेच एकनाथ खडसे यांच्या सूनबाई खासदार रक्षा खडसे यांनादेखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती आज दुपारी समोर आली होती. त्यानंतर एकनाथ खडसे यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. त्यामुळे खडसे कुटुंबात कोरोनाचा शिरकाव झालेला आहे.

“माझी कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली असून माझी तब्येत चांगली आहे, काळजीचे कारण नाही. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, अशी मी विनंती करतो.”असे ट्विट करून त्यांनी संपर्कात आलेल्यांना कोरोनाची चाचणी करून घेण्याची विनंती केली आहे.

Leave a comment

0.0/5