Skip to content Skip to footer

जाणून घ्या सारा अली खान काय म्हणाली लग्न करण्याबाबत…

केदारनाथ या चित्रपटाद्वारे तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. साराच्या या पहिल्याच चित्रपटातील भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. त्यानंतर ती सिम्बा या चित्रपटात झळकली. सध्या ती लव्ह आज कल या चित्रपटाच्या सिक्वलमध्ये काम करत असून या चित्रपटात तिची जोडी कार्तिक आर्यन सोबत जमली आहे. विशेष म्हणजे लव्ह आज कल या चित्रपटाचा नायक सैफ अली खान होता..

कार्तिक आणि सारा यांच्यात मैत्रीपेक्षा काहीतरी अधिक असल्याची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा आहे. सारा आणि कार्तिकला सध्या अनेक वेळा एकत्र पाहाण्यात येतंय. काही दिवसांपूर्वी ते दोघे एका कारमध्ये दिसले होते. पण मीडियाच्या कॅमेऱ्यांना पाहाताच साराने आपला चेहरा लपवला होता. तर आता चेहऱ्यावर स्कार्फ बांधून सारा आणि कार्तिका ईदला फिरताना दिसले. त्यांच्या नात्याबाबत मीडियात चांगलीच चर्चा होत असताना याबाबात सारा आणि कार्तिकने काहीही न बोलणेच पसंत केले आहे.

साराने नुकतीच Bazaar India ला मुलाखत दिली असून त्यांच्या कव्हर पेजवर ती झळकली आहे. या मुलाखतीत तिने तिच्या लग्नाबद्दल देखील भरभरून गप्पा मारल्या आहेत. या मासिकाच्या कव्हर पेजवरचा साराचा फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केला असून या फोटोत ती खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोसोबतच या मुलाखतीत साराने लग्नाविषयी काय सांगितले हे लिहिले आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, मला कायम माझ्या आईसोबतच राहायचे आहे. मी ज्यावेळी तिला हे सांगते, त्यावेळी तिला या गोष्टीचे खूप वाईट वाटते. कारण तिने माझ्या लग्नासाठी अनेक बेत रचले आहेत. मला तिच्यासोबत फिरायला खूप आवडते. काही दिवस जरी मी तिच्यापासून दूर असेल तर मी तिला खूप मिस करते.

Leave a comment

0.0/5