Skip to content Skip to footer

‘रामायण’ मालिकेनं रचला जागतिक इतिहास, दूरदर्शननं मानले प्रेक्षकांचे आभार

लॉकडाऊनमुळे रामायण या लोकप्रिय शोचं डीडी नॅशनलवर रि-टेलिकास्ट करण्यात आलं. तेव्हापासून हा शो काही ना काही कारणानं चर्चेत आहे. त्यावेळी या शोला जेवढं प्रेम प्रेक्षकांकडून मिळालं तेवढं प्रेम आताही मिळत आहे. अशात या शोनं आता एक जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. काही दिवसांपूर्वीच डीडी नॅशनलनं रामायण हा जगभरात सर्वाधिक पाहिला गेलेला नंबर वन शो ठरल्याचं सांगितलं होतं त्यानंतर आता दूरदर्शननं सुद्धा यासाठी प्रेक्षकांचे आभार मानणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

दूरदर्शन नॅशनलनं त्यांच्या ऑफिशिअल ट्विटर अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. ‘आमच्या सर्व प्रेक्षकांचे आभार #RAMAYAN – WORLD RECORD!!, जगात सर्वाधिक पाहिला गेलेला टीव्ही शो.’ या पोस्टमध्ये दूरदर्शननं एक व्हिडीओ सुद्धा शेअर केला आहे. ज्यात रामायण पाहणारे प्रेक्षक दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये प्रेक्षकांनी रामायण पाहताना शेअर केलेले फोटो वापरण्यात आले आहेत. दूरदर्शनची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

या अगोदर डीडी इंडियानं त्यांच्या ऑफिशिअल ट्विटर हॅन्डलवरुन एक ट्वीट केलं होतं. यात त्यांनी म्हटलं होतं की, ’16 एप्रिलला प्रसारित झालेला रामायणचा एपिसोड जगभरात 7.7 कोटी लोकांनी पाहिला. यासोबतच हा जगात सर्वाधिक पाहिला गेलेला शो ठरला आहे.’

रामानंद सागर यांचा रामायण हा टीव्ही शो जेव्हा रि-टेलिकास्ट करण्यात आला तेव्हापासून या शोबद्दल रोज काही ना काही रंजक किस्से ऐकायला मिळत आहेत. या मालिकेत काम केलेल्या कलाकारांबाबत जाणून घेण्यात सर्वजण उत्सुक असलेले पाहायला मिळत आहेत.

Leave a comment

0.0/5