Skip to content Skip to footer

Video: अशा प्रकारे साकारला गेला रोबोट २.० चा खलनायक

लवकरच दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय यांचा रोबोट २.० हा चित्रपट रिलीज होणार आहे. अक्षय या चित्रपटात विलनच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच सोशल मीडियावर या भूमिकेला न्याय देण्याकरिता त्याचा लूक तयार करण्यासाठी कशाप्रकारे मेहनत घ्यावी लागली, याचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

https://www.instagram.com/p/BqPN_z1HbuK/?utm_source=ig_web_copy_link

हा व्हिडिओ अक्षयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. त्याच्या मेकअपसाठी घेण्यात येणारी मेहनत या व्हिडिओत पाहायला मिळते. अक्षयने एका मुलाखतीत याबद्दल बोलताना सांगितले होते, की जेवढा मेकअप या चित्रपटासाठी केला आहे तेवढा आत्तापर्यंत कधीच केला नाही. मला या मेकअपसाठी तासनतास द्यावे लागायचे, तेव्हा असा लूक तयार व्हायचा. २.०चे नवे पोस्टरही रिलीज करण्यात आले आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी हे पोस्टर शेअर केले आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला जसा प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.

असाच प्रतिसाद चित्रपटाला मिळावा, अशी आशा अक्षयने व्यक्त केली आहे.

Leave a comment

0.0/5