Skip to content Skip to footer

मुंबई महानगर पालिकेतर्फे स्वतंत्र वीज निर्मिती सुरु

मध्य वैतरणा जलाशयातून मुंबई महानगरपालिकेचे स्वतंत्र वीजनिर्मिती केंद्र सुरु करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली. राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयात मुंबई महानगरपालिकेला आपले स्वतंत्र वीजनिर्मिती केंद्र सुरु करण्याची परवानगी देण्यात आली. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशयातून ही वीजनिर्मिती केली जाईल. याबाबतची तांत्रिक यंत्रणा कार्यान्वित होऊन त्याच्या निविदा लवकरच उपलब्ध होतील. अशी माहिती देण्यात आलेली आहे.

तसेच उद्धव ठाकरे मध्यवैतरणा जलाशय पूर्ण केल्यावर त्यातून मुंबई महानगरपालिकेचे स्वतंत्र विजनिर्मीती केंद्र सुरू करू, असं वचन शिवसेनेनं दिलं होतं. मुबंई महानगरपालिकेच्या 2002 च्या वचननाम्यात शिवसेनेनं हे आश्वासन दिले होते. दरम्यान, महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयात मुंबई महापालिकेला आपलं स्वतंत्र वीजनिर्मीती केंद्र सुरू करण्याची परवाणगी देण्यात आली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जलाशयातून ही वीज निर्मिती केली जाईल.

Leave a comment

0.0/5