Skip to content Skip to footer

कंगनानं पालिकेच्या ‘वादात’ शरद पवारांना ओढलं; जितेंद्र आव्हाड म्हणाले…

पाठवण्यात आलेल्या नोटीसीच्या चर्चेवरून शरद पवारांचा केला होता उल्लेख

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना प्रत्युत्तर देताना अभिनेत्री कंगना रणौत हिनं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. त्यानंतर हे प्रकरण गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसत आहे. तसंच आताही दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहे. बुधवारी कंगनाच्या कार्यालयावर मुंबई महानगरपालिकेतर्फे कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरही कंगनानं पालिकेवर आणि सरकारवर निशाणा साधला होता. त्यानंतर मुंबई महापालिकेतर्फे २०१८ मध्ये कंगनाला बजावण्यात आलेली एक नोटीस सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.

कंगनाच्या खार येथील घरी मुंबई महापालिकेनं नोटीस पाठवली होती. ज्या ठिकाणी पालिकेतर्फे बुधवारी कारवाई करण्यात आली त्या ठिकाणी कोणतीही नोटीस पाठवण्यात आली नव्हती. ही नोटीस केवळ आपल्यासाठी नसून संपूर्ण इमारतीसाठी होती. या नोटीसला बिल्डरनं सामोरे जाण्याची आवश्यकता असून ती बिल्डींग शरद पवार यांच्या संबंधित आहे. आम्ही त्यांच्या पार्टनरकडून हे घर विकत घेतलं होतं. असं कंगनानं म्हटलं होतं. तसंच कंगनानं एक नोटीसही शेअर केली होती. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे.

त्यांनी कंगनाचं नाव नं घेता तिच्यावर निशाणा साधला आहे. “शरद पवार यांनी संपूर्ण महाराष्ट्र उभा केला आणि बांधला हे महाराष्ट्राला माहितीये. पण जिला महाराष्ट्राबद्दल काहीच माहित नाही ती म्हणते त्यांनी बिल्डिंग बांधली,” असं म्हणत त्यांनी निशाणा साधला. तसंच यासोबत त्यांनी मानसिक रोगी असा हॅशटॅगशीही शेअर केला आहे.

Leave a comment

0.0/5