Skip to content Skip to footer

कोरोना विरोधातील लढाईत कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या मॅरेथॉन बैठकाचा सपाटा

कोरोना विरोधातील लढाईत कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी आज मॅरेथॉन बैठका घेतल्या. आज डॉ श्रीकांत शिंदे यांनी कल्याण – डोंबिवली , उल्हासनगर, अंबरनाथ येथे तयार करण्यात आलेल्या स्वतंत्र कोविड हॉस्पिटल आणि स्वतंत्र क्वारंटाईन इमारतीचा घेतला आढावा घेतला. यावेळी कोकण विभाग आयुक्त श्री शिवाजी दौड , कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी, उल्हासनगर महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख, ठाणे जिल्हा सिव्हिल सर्जन डॉ कैलास पवार, अंबरनाथचे आमदार श्री बालाजी किणीकर, नगराध्यक्ष सौ मनीषा वाळेकर आदि प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

आज कल्याण – डोंबिवली महापालिकेत आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांच्या दालनात झालेल्या बैठकीत शीळफाटा येथील 40 बेडचे निऑन हॉस्पिटल स्वतंत्र कोविड हॉस्पिटल रूपांतर करण्याचा निर्णय झाला. तर यासाठी आवश्यक असणाऱ्या व्हेंटिलेटर, PPE किट, N 95 मास्क आदींसाठी आपत्कालीन खर्चातून मान्यता देण्यात आली. कल्याण – डोंबिवली येथील इंडियन मेडिकल असोसिएशन , निमा डॉक्टर्स असोसिएशन आणि केम्पा डॉक्टर्स असोसिएशनचे डॉक्टर्स या कोविड रुग्णालयात सेवा देण्यास पुढे आले आहेत.

तर उल्हासनगर महापालिका आयुक्त श्री सुधाकर देशमुख यांच्या दालनात झालेल्या बैठकीत उल्हासनगर 4 येथील 50 बेडचे शासकीय प्रसूतीगृह रुग्णालय स्वतंत्र कोविड हॉस्पिटल रुपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीनंतर या दोन्ही कोविड हॉस्पिटलमध्ये खासदार डॉ श्रीकांत शिंदे स्वतः प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत भेट दिली आणि तयारीचा आढावा घेतला.

तसेच कोरोना संशयितांसाठी तयार करण्यात आलेल्या अंबरनाथ येथील छाया रुग्णालयची पाहणी केली. यावेळी कोकण विभागीय आयुक्त श्री शिवाजीराव दौड, अंबरनाथ नगरपालिका मुख्याधिकारी श्री देविदास पवार, आमदार डॉ बालाजी किणीकर, नगराध्यक्ष सौ मनीषा वाळेकर आदि उपस्थित होते. आवश्यकता भासल्यास अंबरनाथ नगरपालिकेने उभारलेल्या सेल्फ क्वारंटाईन इमारतीलाही डॉ शिंदे यांनी भेट दिली. याठिकाणी कोरोना संशयितासाठी स्वतंत्र 100 रूमची व्यवस्था करण्यात आली आहे.

Leave a comment

0.0/5