Skip to content Skip to footer

डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन तर्फे पाच दिवसांत तब्बल २५,३२९ नागरिकांची आरोग्य तपासणी

कोरोना महामारीच्या संकंटावर मात करण्यासाठी राज्य सरकार ताप, सर्दी, कोरडा खोकला, श्वसनास त्रास होणे अशी लक्षणे आढळल्यास नागरिकांनी स्वत:हून जवळच्या रुग्णालयात जाऊन वैद्यकीय तपासणी करण्याचे सातत्याने आवाहन करत असताना देखील अनेक ठिकाणी नागरिक सुध्दा भिती पोटी स्वत:हून तपासणी करिता पुढे येत नाही आहेत, असे आढळल्याने यासाठी स्वत:हून पुढाकार घेत डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि निऑन हॉस्पिटल, डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने ७ एप्रिल पासून कल्याण विभागातील नागरिकांच्या घराघरांमध्ये जाऊन कोरोना सदृश्य लक्षणांच्या तपासणीचा उपक्रम हाती घेतला आहे.

गेल्या पाच दिवसांमध्येय सोशल डिस्टंसिंगचे पालन करत एकूण २५,३२९ नागरिकांची आरोग्य तपासणी (स्क्रिनिंग) करण्यात आली असून त्यातील २३५ नागरिकांचे शरीराचे तापमान सामान्य पेक्षा थोड्या प्रमाणात जास्त तसेच ८९ नागरिकांचे तापमान सामान्य पेक्षा खूप जास्त आढळल्याने त्यांना जवळच्या डॉक्टरकडे तातडीने पुढील तपासणी आणि औषधोपचार करण्याचा सल्ला दिला तसेच एकूण २३ रुग्णांना ताप, कोरडा खोकला, जुलाब आदीं अतिसंवेदनशील लक्षणे आढळल्याने त्यांना शास्त्रीनगर रुग्णालय, डोंबिवली आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे पुढील उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे.

रिव्हरवूड पार्क १ व २, सागर्ली गाव (खिडकाळी), मोठे पाडे गाव, तळे पाडा, तांबडी पाडा, पाटील पाडा, वेतल पाडा, देसाई गाव, पडले गाव, दिवा पोलिस बीट, डायघर कल्याण पेठा, डायघर मराठी शाळा, शिळ गाव, नेवाळी गाव, मुक्ता रेसिडेन्सी, पलावा सिटी आणि निळजे गाव आदी तब्बल १९ ठिकाणी जाऊन नागरिकांची तपासणी या उपक्रमामध्ये करण्यात आली आहे.

Leave a comment

0.0/5