Skip to content Skip to footer

कोरोनाचा धोका पत्कारून जर्मनीत विमान नेल्या बद्दल शिवसैनिकाच्या मुलाचे सर्वत्र कौतुक

कोरोनाचा धोका पत्कारून जर्मनीत विमान नेल्या बद्दल शिवसैनिकाच्या मुलाचे सर्वत्र कौतुक

सध्या संपूर्ण जगभरात कोरोना या संसर्गजन्य आजाराने हाहाकार माजवला आहे. त्यातच सर्व देशांनी इतर देशातून येणाऱ्या विमान सेवा बंद केल्या आहे. फक्त अत्यावश्यक सेवेसाठीच एअर इंडियाची विमाने सोडण्यात येत आहे. भारतात अडकलेल्या जर्मन नागरिकांना त्यांच्या देशात सुखरूप पोहचवण्यासाठी व कोरोना प्रतिबंधक औषधी व इतर साहित्य नेण्यासाठी एअर इंडियाने जर्मनीला विशेष विमान पाठवण्याचा निर्णय घेतला. पण विमान जर्मनीला नेणार कोण ? एअर इंडियाने विचारणा करताच मोहनीश परब याने तात्काळ मी जायला तयार आहे, असे सांगितले. तसेच ही त्याने मोहीम फत्ते सुद्धा केली. मोहनिश परब गिरगाव येथे राहत असून त्याचे वडील कट्टर शिवसैनिक आहेत.

या बद्दल मोहनिशने सांगितले की, जेव्हा मी जर्मनीला विमान घेऊन जाणार आहे असे त्याम जेव्हा सांगितले तेव्हा त्यांना काळजी वाटली. मी सांगितले की आम्ही ही मोहीम कोरोनापासून बचाव करणारी पीपीई किट घालून पूर्ण करणार आहोत, तेव्हा त्यांची काळजी कमी झाली. आंतरराष्ट्रीय उड्डाणात मुकामाच्या ठिकाणी पोहचल्यानंतर आम्ही तिथे दोन दिवस मुक्काम करतो. पण जर्मनीच्या या मोहिमेत आम्ही जर्मनीला पोहचल्यानंतर तिथे न थांबता लगेच परत निघालो. या मोहिमेत आम्ही २० तास पीपीई किट घालूनच होतो, अशी माहिती मोहनिश याने दिली.

Leave a comment

0.0/5