Skip to content Skip to footer

मुंबई ही खाली झालीच पाहिजे – भास्कर जाधव

मुंबई ही खाली झालीच पाहिजे – भास्कर जाधव

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे जो तो आपआपल्या परीने घराची वाट धरत आहे. प्रत्येकजण गावी येण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र अशा परिस्थितीत मुंबई ही खाली झालीच पाहिजे, या मताशी आजही आपण ठाम आहोत. तसेच चालत येणाऱ्या चाकरमान्यांना बससेवा देण्याची मागणी देखील मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याची माहिती आमदार भास्कर जाधव यांनी दिली. तसेच त्यांनी गुहागर तालुक्‍यात १०० बेडचे कोरोना केअर सेंटरच्या उभारण्याची तयारी करण्यात आली असल्याचेही सांगितले.

आमदार भास्कर जाधव म्हणाले की, कोरोना रुग्णांची वाढती संख्या मुंबई, पुण्यातील चाकरमान्यांच्या माथी मारणे देखील पूर्णत: चुकीचे आहे. आजही कोरोना ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेला नाही. हा भाग सुरक्षित असल्याने शक्य तेवढ्या नागरिकांना गावी आणणे गरजेचे आहे. त्यासाठी सलग आठ दिवस बससेवा सुरू करून चालत येणाऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. तसेच या संकटात चाकरमान्यांचा कोणताही दोष नाही. त्यामुळे त्यांना चांगली वागणूक अथवा सेवा मिळालीच पाहिजे, असेही जाधव यांनी सांगितले

Leave a comment

0.0/5