Skip to content Skip to footer

मुंबई सारख्या कोविड रुग्णालयाच्या सुविधा ठाण्यातही उभारा ! – मुख्यमंत्री

मुंबई सारख्या कोविड रुग्णालयाच्या सुविधा ठाण्यातही उभारा ! – मुख्यमंत्री

ठाण्यात कोरोनाच्या वाढती संख्या चिंताजनक आहे. त्याचमुळे मुंबई प्रमाणे ठाण्यात सुद्धा कोविड रुग्णालयासाठी सुविधा तातडीने उपलब्ध करा, असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. तसेच कोरोनाशी लढाई एकांगी नको, पालिकांनी नागरिक, स्वयंसेवी संस्था यांना सहभागी करुन घ्यावे असे सुद्धा स्पष्ट आदेश दिलेले त्यांनी आहेत. आज व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्यांनी संवाद साधला.

यावेळी मुख्य सचिव संजय कुमार, प्रधान सल्लागार अजोय मेहता यांनी आयुक्तांना कोरोनाचा संसर्ग कोणत्याही परिस्थितीत रोखण्यासाठी कठोर पाउले उचलण्यास सांगितले. ‘या तीन चार महिन्यांच्या लढाईत काय करावे आणि काय करु नये याविषयी सर्वांना पुरेशी माहिती झाली आहे. तसेच सर्व सूचना आणि निर्देश स्वयंस्पष्ट असतात. याप्रमाणे सर्व आयुक्तांनी अधिक बारकाईने लक्ष घालून कारवाई केली, तर आपल्याला अपेक्षित यश मिळेल अशी मला खात्री आहे’, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a comment

0.0/5