Skip to content Skip to footer

आरे आंदोलनवरील गुन्हे ठाकरे सरकार घेणार मागे

आरे आंदोलनवरील गुन्हे ठाकरे सरकार घेणार मागे

तत्कालीन भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये आरे येथील मेट्रोच्या कामासाठी तोडण्यात येणाऱ्या वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या पर्यावरण प्रेमींवर भाजपाच्या सरकारने गुन्हे दाखल केले होते. हे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत अशी मागणी अनेकवेळा पर्यावरण प्रेमींकडून तसेच विविध संघटनेकडून करण्यात येत होती. मात्र यावर आता आघाडी सरकारच्या नेत्याने वक्तव्य केले आहे.

यावर आता आरे येथील मेट्रो-3 च्या कारशेड विरोधात आंदोलन पुकारणाऱ्या आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे पुढच्या दहाच दिवसात मागे घेतले जातील, असे आश्वासन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहे. आरे संवर्धन समितीच्या शिष्टमंडळाने जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर समितीचे अध्यक्ष रोहित जोशी यांनी माध्यमांशी संवाद साधला होता.

Leave a comment

0.0/5