Skip to content Skip to footer

आमदार योगेश कदम यांच्या वर्षपूर्ती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन


आमदार योगेश कदम यांच्या वर्षपूर्ती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

दापोली मतदारसंघाचे युवा आमदार योगेश रामदास कदम यांच्या आमदार पदाच्या वर्षपूर्तीनिमित्त दापोली तालुक्यातील दुर्गम भागातील गावांपैकी एक असलेले ‘भोमडी’ येथे शिवसेना शाखा भोमडी व जनकल्याण रक्तपेढी महाड यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तगट तपासणी व रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराला आमदार योगेश कदम यांनी भेट देऊन उपस्थितांचे आभार मानले होते.

या कार्यक्रमाप्रसंगी योगेश कदम यांना अनेकांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या होत्या. तसेच त्यांच्या माध्यमातून होत असलेल्या लोकहिताच्या कामाचे उपस्थित जनतेकडून कौतुक सुद्धा करण्यात आले होते. यावेळी रक्तदान शबीर राबवणाऱ्या आयोजकांचे आ. कदम यांनी आभार मानले होते. याप्रसंगी उपस्थितांना त्यांनी मार्गदर्शन सुद्धा केले.

या शिबिराला चांगला प्रतिसाद देत सर्व वयोगटातील नागरिकांनी यात सहभाग नोंदवला व एकूण ८० जणांनी रक्तदान केले. तसेच ५० हुन अधिक नागरिकांनी आपल्या रक्तगटाची तपासणी करून घेतली. या शिबिरात रक्तदान केलेल्या सर्वांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.

Leave a comment

0.0/5