Skip to content Skip to footer

मुंबईत मुलीचा जन्मदर आहे समाधानकारक

मुंबईत मुलीचा जन्मदर आहे समाधानकारक

मुंबईत मुलींचा जन्मदर समाधानकार असल्याची माहिती समोर येत आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या केंद्र शासनाच्या राष्ट्रीय कुटुंब अहवालानुसार मुंबई एकूण १००० मुलांमागे ९३९ इतके प्रमाण आहे. तर उपनगरात ९२१ इतके आहे. २०१५-१६ च्या तुलनेत मुंबई आणि मुंबई उपनगरात मुलींचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. २०१५-१६ साली मुलींचा जन्मदर ९०६ इतका होता.

राज्य शासनातर्फे PCPNDT कायदा लागू करून गर्भनिदान चाचणीवर बंदी आणण्यात आली होती. या शिवाय २०१५ पासून संपूर्ण राज्यभरात “बेटी बचाव बेटी पढाव” ही योजना राबवण्यात आली होती. या योजनेमुळे मुलींचा जन्मदर वाढण्यात अधिक यश राज्य शासनाला मिळाले आहे. मात्र शासनाचा उद्देश १००० मुलांमध्ये मागे ९९४ इतका आहे.
राज्यात २०१३ मध्ये मुलींच्या जन्माचे लिंगप्रमाणं १००० मुलांमागे फक्त ९०० इतके होते. जे २०१३-१४ मध्ये ९१४ इतके सुधारले होते. मात्र २०१५ मध्ये हे प्रमाण ९०७ वर पोहचले. २०१६ आणि २००१७ जन्म नोंदणीचे प्रमाण अनुक्रमे ९०४ आणि ९१३ इतके आहे. २०१८ च्या अहवालानुसार त्यात सुधारणा होऊन ९१६ वर पोहचले आहे.

Leave a comment

0.0/5