Skip to content Skip to footer

लोकलने प्रवासासाठी जाताय?, तर हे नियम लक्षात ठेवा

सोमवारपासून सर्वसामान्यांसाठी पुन्हा सुरू होत असल्या तरीही गर्दीमुळे संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा संसर्ग पसरणार नाही याची योग्य प्रकारे खबरदारी घेऊन प्रवास करणे गरजेचे आहे, याकडे वैद्यकीय तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे. प्रवास सुरू करण्यापूर्वी ई पास, तिकीट काढा, तसेच सोबत तीन प्लाय फेस मास्क, हॅन्ड सॅनिटायझर, निर्जंतूक वाइप्स ठेवा, मास्क बदलण्याची गरज लागल्यास बॅगेत अतिरिक्त मास्कसोबत ठेवा, घराबाहेर पडण्यापूर्वी शक्य असतील तर ग्लोव्ह्ज घाला.

प्रवास सुरू करण्‍यापूर्वी साबण व पाण्‍याने हात स्‍वच्‍छ धुवा आणि त्‍यानंतर मास्‍क घाला. मास्‍क घातल्‍यानंतर संबधित ठिकाणी पोहोचेपर्यंत मास्कला स्पर्श करू नका किंवा मास्क काढू नका, असा सल्ला इंटेन्सिव्हिस्ट डॉ. संदीप पाटील यांनी दिला आहे.

लसीकरण सुरू झाल्यामुळे मास्क घालायची गरज नाही या भ्रमामध्येही अनेकजण आहेत. मास्क खाली घेणे, फोनवर बोलताना मास्कचा वापर न करणे, गुटखा, पान-तंबाखूसदृश्य पदार्थ खाऊन थुंकणे हे प्रकार आता थांबायला हवेत, त्यामुळे संसर्ग होण्याचे प्रमाण वाढू शकते, हे लक्षात घ्यायला हवे. असे संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ डॉ. एम. एम. मुकणे यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a comment

0.0/5