Skip to content Skip to footer

पिंपळे सौदागर येथील उन्नति सोशल फाऊंडेशन तर्फे कामगार दिनानिमित्त साफसफाई कामगारांच्या हस्ते पाणपोईचे उदघाटन.

पिंपळे सौदागर :

दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढतच आहे त्यामुळे माणसाला मोठ्या प्रमाणात थंडगार पाणी पिण्याची इच्छा होत आहे. घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना बाटलीबंद पाणी घेतल्या शिवाय पर्याय नाही. मात्र पिंपळे सौदागर येथील उन्नति सोशल फाऊंडेशनने अनोखा उपक्रम सुरु करून परिसरात थंडगार पाण्याची मोफत व्यवस्था केली आहे.

महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त परिसरात १० ठिकाणी मोफत पाणपोईची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. या पाणपोईचे उदघाटन साफसफाई कर्मचारी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उन्नति सोशल फाऊंडेशनचे संस्थापक मा. श्री. संजय तात्याबा भिसे, अध्यक्षा सौ. कुंदाताई संजय भिसे, जेष्ठ नागरिक रवींद्र पाटील, रमेश वाणी, रामप्रकाश वासन, विनोद भल्ला, विलास नगरकर, तसेच आनंद हास्य योगा क्लबचे सर्व सभासद वनवचैतन्य हास्य क्लब चे सभासद व परिसरातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर ,परिसरातील नागरिक उपस्थित होते.

पिंपळे सौदागर येथील उन्नति सोशल फाऊंडेशन तर्फे कामगार दिनानिमित्त साफसफाई कामगारांच्या हस्ते पाणपोईचे उदघाटन.कामगार दिनानिमित्त उन्नति सोशल फाऊंडेशनच्या वतीने मोफत पाणपोईचे उदघाटन करताना संस्थापक संजय भिसे,अध्यक्षा कुंदा भिसे, साफसफाई कामगार व मान्यवर…

 

 

साफसफाई कामगार इस्माईल शेख, दिनेश तुपे, चंदन बोरीकर, सुनील शेळके, शैलेश मगर, गोरख दाभाडे, कृष्णा साळवी, विशाल पवार, आकाश पडवळ, राहुल धन्द्रे, अलका आलटे व विकास सुटेकर यांच्या हस्ते मोफत पाणपोईचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना कुंदाताई भिसे म्हणाल्या,आपण ज्या समाजात राहातो त्या समाजाचे आपण काही तरी देणे लागतो हि भावना मनात असणे गरजेचे आहे. त्यासाठी समाजाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी असे उपक्रम राबविणे हि काळाची गरज आहे. सध्या उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत आहे. कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांची तहान भागविण्यासाठी मोफत थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या उपक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे भिसे यांनी सांगितले.

Leave a comment

0.0/5