Skip to content Skip to footer

गोदामाला आग;जीवित हानी नाही

पुणे/ प्रतिनिधी: आज (शुक्रवार) सकाळी साडेआठच्या सुमारास शहरातील अखिल मंडई गणपती मंदिरा मागील बाजूस असणाऱ्या जुन्या वाड्यातील गोदामास आग लागली. गोदामाशेजारील दोन घरे जळाली या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

याबाबत मिळालेली माहिती अशी साडेआठच्या सुमारास मंडई गणपती मंदिरा मागील एका जुन्या वाड्यास आग लागली. यानंतर अग्निशामक पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.त्यात ३ टँकर आणि ४ अग्निशमन विभागाच्या गाड्या यांचा समावेश होता.

जुन्या वाड्याच्या मागील बाजूस असणाऱ्या एका गोदामाला ही आग लागली होती. त्यात जुनी बारदाने व अन्य वस्तू होत्या. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. गोदामाला लागलेल्या आगीत मात्र शेजारील दोन घरांना त्याची झळ बसून ती घरे जळाली आहेत. त्यात अनेक गृहोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. घटनास्थळी शफीक सय्यद, योगेश दोडगे, रौफ शेख, मंगेश मिळवणे यांनी प्रयत्नपूर्वक आग आटोक्यात आणली.

Leave a comment

0.0/5