Skip to content Skip to footer

लहुजी वस्ताद साळवे यांचे संगमवाडीला भव्य स्मारक उभारणार -गिरीष बापट

आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे संगमवाडीला भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याचे खासदार गिरीष बापट यांनी सांगितले. भाजपचे नगरसेवक अजय खेडेकर यांच्या विकासनिधीतून लहुजी वस्ताद साळवे तालीम येथील अद्ययावत सुधारणा कामे, विविध विकासकामे आणि ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे उदघाटन आज गिरीष बापट यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

लहुजी वस्ताद तालीम गंज पेठ येथे हा कार्यक्रम आयोजित केला होता. नगरसेवक अजय खेडेकर, नगरसेविका आरती कोंढरे, नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लहुजी वस्ताद साळवे यांचा विजय असो, अशा अनेक घोषणा समाज बांधवांनी दिल्या.

यावेळी गिरीष बापट म्हणाले, लहुजी वस्ताद साळवे यांचा स्वतंत्र मिळण्यात मोठा वाटा आहे. त्यांच्या कार्यातून काम करण्याची प्रेरणा मिळते. लवकरच संगमवाडीला त्यांच्या नावाने भव्य असे स्मारक होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.त्यानंतर अजय खेडेकर म्हणाले, मागील 20 ते 25 वर्षे तालमीचा प्रश्न प्रलंबित होता.

या ठिकाणी अनेक विकासकामे केल्याचे आता समाधान आहे. ही कामे करण्यासाठी महापालिका पदाधिकाऱ्यांनी साथ दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, नगरसेवक अविनाश बागवे यांनी हजेरी लावली. या दोघांचाही गिरीष बापट यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Leave a comment

0.0/5