पुणे : शहरात सुमारे तीन हजार बांधकामांना परवानगी मागील दोन वर्षत महापालिके कडून देण्यात आली आहे, पण ह्या चालू बांधकामामधील फक्त २० टक्के बांधकामाची नोंदणी रेरा अंतर्गत झाली आहे. जवळपास ८०% बांधकामांची नोंद रेरा मध्ये झाले नाही अशी माहिती Pune Bulletin च्या सूत्रांकडून पुढे येत आहे.
रेरा ला नोंदणी करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै होती पण ह्या तारखे आधी अनेक बांधकाम व्यावसायिकांनी भोगवटा पात्र महापालिकेकडून घेतली, त्यातील बरीचशी बांधकामे अपूर्ण आहेत असा आरोप पालिकेवर करण्यात येत आहे.
पुणे महानगर पालिकेच्या हद्दीत ३००० बांधकाम प्रकल्पांची नोंदणी आहे. त्यातील सडे तीनशे प्रकल्पांची नोंद रेरा कडे झाली आहे. तर, आधीच भोगवटा प्रमाणपत्र मोळवणाऱ्या बांधकामांना व्यावसायिकांची संख्या दीड हजार.
नोंदणी न झालेल्या बांधकामांवर व अपूर्ण बांधकाम असतानाही भोगवटा पात्र घेणाऱ्या व्यावसायिकांवर काय कारवाई होणार असा विषय आता समोर आला आहे.
रेरा रेजिस्ट्रेशन साठी खालील लिंक वर क्लिक करा