Skip to content Skip to footer

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज बीज सोहळा थाटात पार पडला.

संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज बीजसोहळा देहू येथे पार पडला. इंद्रायणी काठी तुकोबारायांच्या नामघोषाने व विठुरायाच्या जयघोषात असंख्य वैष्णव भक्तिमय वातावरणात लीन झाल्याचे दिसून आले. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या ३७२ वा बीज सोहळा थाटात संपन्न झाला. पहाटे तीन वाजल्यापासून सुरु झालेला संपूर्ण दिवस काकडा आरती व महापूजेमुळे संपूर्ण देहूगावात सांप्रदायिक सुवास देऊन गेला.

लाखोंच्या संख्येने आलेले भक्त इंद्रायणी काठी तुकोबारायांच्या तसेच विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होऊन उत्सवात सामील झाले. रखरखते ऊन तसेच इतर कसल्याही गोष्टीची तमा न बाळगता तुकोबारायांच्या नामस्मरणात भाविक एकरूप झाले. दरवर्षीप्रमाणे देहू गावात बीज सोहळ्यानिमित्त विविध ठिकाणी आकर्षक सजावट करण्यात आली होती. तसेच अनेक ठिकाणी कीर्तन व भजनाचे कार्यक्रमही पाहावयास मिळाले. यावेळी तुकाराम महाराजांचा जयघोष करत भाविकांनी देहू येथील नांदुरकीच्या झाडावर पुष्पवृष्टी केली.

Leave a comment

0.0/5