Skip to content Skip to footer

“हमे बिमारी से लढना है, बीमार से नही” चा जपला अर्थ ! – मंचर मध्ये शिवसेनेकडून गौरवास्पद काम.

“हमे बिमारी से लढना है, बीमार से नही” चा जपला अर्थ ! – मंचर मध्ये शिवसेनेकडून गौरवास्पद काम.

सध्या कोरोनच्या या कठीण काळात प्रत्येक स्वतःकडे अधिक लक्ष देत आहे. इतरांना मदत करण्यापूर्वी अनेकदा आपण चार वेळेस विचार करतो. परंतु या मानसिकतेला दुजोरा देत शिरूर तालुक्यातील मंचर येथे शिवसैनिकांनी एक आदर्श घेण्यासारखं काम केलं आहे. काही दिवसांपूर्वी येथील एक गरोदर महिला मुंबई येथून मंचरमध्ये आली होती. सहा जून रोजी तिला कन्यारत्न प्राप्त झाले होते. परंतु सदर महिला कोरोना पॉजिटीव्ह असल्याने तिला क्वारंटाईन करण्यात आले होते.

आईच्या अनुपस्थितीत या बाळाचा संपूर्ण सांभाळ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी केला. तसेच यादरम्यान कर्मचारी व या बाळाचा एक स्नेहपूर्ण नातं जमलं होतं. या बाळाने सर्व कठीण परिस्थितीवर मात करत कोरोनाविरुद्ध यशस्वी लढा दिला. त्यामुळे या बाळाचा कोविड योद्धा म्हणून सन्मान देखील करण्यात आला. शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या सूचनेवरून मंचर गावाचे सरपंच दत्ता गांजाळे यांनी सदर बाळाची सर्व शैक्षणिक जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत. सदर बाळाचा मॅक्स लाइफ इन्शुरन्स कंपनीचा विमा देखील उतरवला. त्यामुळे या बाळाचे पुढचे शैक्षणिक भविष्य अंधारात राहणार नाही याची काळजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी घेतली आहे.

त्यामुळे “हमे बिमारी से लढना है, बीमार से नही” या वाक्याचा अशाप्रकारे अर्थ जपत सरपंच दत्ता गांजाळे यांनी समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.

Leave a comment

0.0/5