Skip to content Skip to footer

वीजक्षेत्रातही महिलांची कामगिरी उल्लेखनीय

पुणे : महावितरण, महापारेषणमध्ये महिला अभियंता व कर्मचारी वीजमीटर जोडण्यांपासून ते टॉवरलाईनच्या देखभाल व दुरुस्तीचे सर्व तांत्रिक कामे अतिशय कौशल्याने व आत्मविश्वासाने करीत आहे. संधी मिळाल्यास वीजक्षेत्रात सुद्धा महिला महत्वाची व उल्लेखनीय कामगिरी बजावू शकतात हे प्रत्यक्षात दिसून आले आहे, असे मत मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार यांनी व्यक्त केले.

रास्तापेठ येथील प्रशासकीय इमारतीमध्ये शुक्रवारी (दि. 8) आयोजित जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापारेषणचे प्रभारी मुख्य अभियंता श्री. वंदनकुमार मेंढे, अधीक्षक अभियंता श्री. राजेंद्र पवार, सहाय्यक महाव्यवस्थापक (एचआर) श्री. राजेंद्र म्हंकाळे व श्री. प्रशांत चौधरी, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. रामगोपाल अहिर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी महिला दिनानिमित्त शपथ घेण्यात आली.

कार्यक्रमात महावितरणमधील महिला क्रीडापटू निशा पाटील, अनिता कुलकर्णी, कमलरुख दारूखानवाला, अंकूर ठाकूर, वर्षा बोपटे, वैष्णवी गांगरकर, ऋुतुजा तारे, अश्विनी जाधव, अनिता सोनेरी, शितल नाईक, सायली कचरे, संगिता देशमुख, माया येलवंडे तसेच महापारेषणमधील नाट्यकलावंत स्नेहल चौरे, पुजा शिंदे, मधुश्री खाटपे यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले जयश्री शेलोकार यांनी केले तर रोहिणी पाटसकर यांनी आभार मानले. यावेळी महिला अभियंता, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Leave a comment

0.0/5