Skip to content Skip to footer

मतदान करण्यात पुन्हा कोल्हापूरच्या जनतेने मारली बाजी

मतदान करण्यात पुन्हा कोल्हापूरच्या जनतेने मारली बाजी
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात मोठया प्रमाणात मतदान पार पडले. आता सर्वांना २४ तारखेला होणाऱ्या मतमोजणीची ओढ लागलेली आहे. या निवडणुकीसह सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठीही मतदान पार पडले. येत्या २४ तारखेला जनता कोणाला सिहासनावर बसवणार आणि कोणाला घरी पाठवणार हे दिसून येईल.

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी सुमारे ५८.४९ टक्के मतदान झाले. सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत ६४.२५ टक्के मतदान झाले असल्याचे माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. तसेच कोल्हापूरात तब्बल ७४ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे.

राज्यात सर्वाधिक ८३.२० टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर मतदारसंघात झाले. त्याखालोखाल शाहूवाडी ८०.१९, कागल ८०.१३ टक्के, शिराळा ७६.७८ तर रत्नागिरी ७५.५९ टक्के मतदान झाले, तर कुलाबा मतदारसंघात सगळ्यात कमी मतदान झाले.

राज्य विधानसभेच्या २८८ जागा तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान झालं. यात ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं आहे. तसेच तसेच आठ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

Leave a comment

0.0/5