Skip to content Skip to footer

आपण एका गाडीत बसू शकलो नाही, पण एकाच स्टेशनवर आलो – मुख्यमंत्री

आपण एका गाडीत बसू शकलो नाही, पण एकाच स्टेशनवर आलो – मुख्यमंत्री

नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी सत्तेतून पायउतार झालेल्या भाजपाला चिमटा काढण्याची संधी सोडली नाही.

मेट्रोच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “आपण एका गाडीत बसू शकलो नाही, पण एका स्टेशनवर आलो आहे. यापुढे राज्य व केंद्र सरकारने मिळून काम केले, तर महाराष्ट्र-दिल्ली विकासाची मेट्रो सुरू करू शकू,” असे मुख्यमंत्री म्हणाले.

वरळीत रखडलेल्या एसआरए प्रकल्पातील अडचणी दूर होणार

दुसऱ्या टप्प्यातील नागपूर मेट्रोचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लिंकद्वारे उद्घाटन केले. मुख्यमंत्र्यांचे भाषण होण्यापूर्वी केंद्रीय नितीन गडकरी यांचे भाषण झाले. यावेळी गडकरी यांनी फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या निर्णयांचं कौतूक केलं. त्याचबरोबर सध्याच्या सरकारनं विकासकामांचे प्रस्ताव पाठवावेत, अस आवाहनही केलं.

त्यानंतर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “नितीन गडकरी यांनी वेळेच्या आत काम पूर्ण केलं आहे. तुम्ही म्हणाल असा कसा मुख्यमंत्री आहे. श्रेयच घेत नाही. राजकारणी म्हटल्यावर श्रेयवाद येतोच. पण, आम्हाला श्रेय नकोय, आम्हाला जनतेचे आशीर्वाद हवे आहेत. नागपूरकरांच्या आशीर्वादांची आम्हाला गरज आहे,” असं सागत नितीन गडकरी यांचं नाव न घेता मुख्यमंत्री म्हणाले.

Leave a comment

0.0/5