Skip to content Skip to footer

खा.डॉ. सुजय विखेंनी घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नगर उपकेंद्रास प्रशासकीय व वित्तीय मान्यता मिळावी, यासाठी खासदार डॉ. सुजय विखे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांची भेट घेतली. नगर व नाशिक येथे विद्यपीठाचे उपकेंद्र २००६ पासून सुरु करण्यात आले, नगरजवळील बाबुर्डी घुमट येथील सुमारे ३२ हेक्टर ९३ आर गायरान जमिनीचे क्षेत्र विद्यापीठाला हस्तांतरित करण्यात आले.

मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या उपकेंद्राला मान्यता देण्याचा निर्णय झाला, परंतु पुढे शासनाने याबाबत कोणतेच पाऊल उचलेले नाही. उपकेंद्राच्या प्रलंबित कामांमुळे नगरमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत अडथळा येत आहे, या उपकेंद्राच्या प्रस्तावास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देऊन गतीने हे काम करावे अशी मागणी खा.डॉ. सुजय विखे यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे केली.

Leave a comment

0.0/5