Skip to content Skip to footer

कोरोना वायरल, मुंबई मनपा आयुक्त घेणार विशेष बैठक

कोरोना वायरल, मुंबई मनपा आयुक्त घेणार विशेष बैठक

देशात कोरोना व्हायसरने प्रवेश केला असून सहा जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे आता उघड झाले आहे. भारतात कोरोनाची लागण झालेल्यापैकी तीन जण केरळचे, एक जण दिल्लीतील नोएडा, एकजण आग्र्याचा आणि एकजण तेलंगणा येथील आहे. उत्तर प्रदेशच्या शाळेत शिकणाऱ्या मुलाच्या वडिलांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यानंतर नोएडातील दोन शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आग्रा येथील १३ जणांचे नमुने घेण्यात आले असून ते पुण्यात तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

               दरम्यान, कोरोना व्हायरसबाबत मुंबईत रणनिती तयार करण्यासाठी विशेष बैठक बोलाविण्यात आली आहे. मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी गुरुवारी एक विशेष बैठक बोलावली आहे. महापालिकेचे आरोग्य अधिकारी, प्रत्येक वार्ड ऑफिसर, महापालिकेच्या रुग्णालयाचे डीन, खासगी रुग्णालयातील अधिकारी यांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोनाबाबत तयारी आणि उपाययोजना यावर चर्चा होणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची डॉ. हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे

Leave a comment

0.0/5