Skip to content Skip to footer

मला उध्वस्थ करण्याचे काम फडणवीसांनी केले – एकनाथ खडसे

मला उध्वस्थ करण्याचे काम फडणवीसांनी केले – एकनाथ खडसे

भाजपाचे जेष्ठ नेते तथा माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार आरोप लगावले आहे. आज मराठवाडा आणि कोकणातून प्रत्येकी तीन तीन मुख्यमंत्री झाले मात्र उत्तर महाराष्ट्रातून मुख्यमंत्री होऊ दिला नाही. मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत जो आला त्याला बाजूला सारले, अशी खंत खडसे यांनी व्यक्त केली आहे.

मला उध्वस्थ करण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले त्यामुळे मला त्रास झाला. मला जो त्रास झाला तो फक्त माजी मुख्यमंत्र्यामुळे झाला म्हणून त्यांचे नाव घेतो, असे जाहीर वक्तव्य खडसे यांनी आज केले आहे. खडसेंच्या या आरोपानंतर भाजपामधील अंतर्गद वाद आता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.

आज खडसे यांच्या जळगावातल्या मुक्ताईनगरमध्ये “जनसेवेचा मानबिंदू एकनाथ खडसे” या पुस्तकाचे प्रकाशन एकनाथ खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. या ऑनलाईन प्रकाशन कार्यक्रमावेळी खडसेंनी आपले मनोगत मांडले. त्यावेळी फडणवीस यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले. यावेळी लवकरच आपण निर्णय घेऊ असा थेट इशारा भाजपाला दिला आहे.

Leave a comment

0.0/5