Skip to content Skip to footer

कोरोनावर उपचार करण्यासाठी ३० रूग्णालय तयार

राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे याचं पार्श्वभूमीवर आरोग्य खात्याने राज्यातील ३० शासकीय रुग्णालय कोरोनाच्या उपचारासाठी  विशेष रुग्णालय म्हणून घोषित केले आहे. त्यासाठी अधिसूचना काढण्यात आली असून २३०५ खाटा कोरोना बधितांच्या उपचारासाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेली आहे.

या सुचनेमुळे या रुग्णालयांना संशयित आणि कोरोनाचे निदान झालेल्या रुग्णांना शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनानुसार उपचार करणे बंधनकारक असणार आहे. राज्यात चाचण्याची सुविधा वाढविताना आवश्यकता भासल्यास जिल्हा रुग्णालयात विलीगिकरण कक्ष करण्यात आले आहेत.

Leave a comment

0.0/5