Skip to content Skip to footer

औरंगाबादमध्ये पोलिसांवर घोळक्याचा हल्ला – संचारबंदी दरम्यान घडला खळबळजनक प्रकार.

औरंगाबादमध्ये पोलिसांवर घोळक्याचा हल्ला – संचारबंदी दरम्यान घडला खळबळजनक प्रकार.

संपूर्ण देशात कोरोनच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी लॉक डाउन लागू आहे. त्यादरम्यान विना आवश्यक कामांच्या घराबाहेर येणे रोखण्यात आले आहे. परंतु तरीही काही प्रमाणात नागरिक बाहेर येत आहेत. त्यांना नियमांची आठवण करून देण्यासाठी अनेक ठिकाणी पोलिसांकडून कठोर कारवाई देखील केली जात आहे. पोलिसांना यादरम्यान नागरिकांकडून केली जाणारी हुज्जत व पोलिसांशी भांडणं केल्याच्या घटना आता समोर येत आहेत. अशीच एक खळबळजनक घटना औरंगाबादेत आज दुपारी घडली.

कलेक्टर ऑफिस, चांदणे चौक या परिसरामध्ये गस्त घालत असलेल्या पोलिसांनी इसमांच्या घोळक्यास बाहेर फिरत असल्याच्या कारणामुळे अडवले. त्यांची विचारपूस करत असताना त्यातील एका इसमाने पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर नियमांचे उल्लंघन केल्यामुळे पोलिसांनी त्यांना ताकीद देत, लाठीने हलकेसे फटकारले. हे होताच संपूर्ण घोळक्याने लाठीधारी पोलिसांवर हल्ला केला. मुख्य मारहाण करणाऱ्या इसमाने पोलिसांच्या हातातली लाठी हिसकावून त्याने पोलिसांवर चालवण्यास सुरुवात केली.

https://www.facebook.com/109399067394600/videos/528873157812393/

या हल्ल्यात पोलीस जबर जखमी झाले असून, हल्लेखोरांना आता अटक करण्यात आली आहे. देशात सुरु असलेल्या चिंताजनक परिस्थितीमध्ये अशाप्रकारच्या घटना घडत असतील तर, कायदा व सुव्यवस्था टिकणार कसे, असा सवाल जनतेकडून विचारण्यात येत आहे.

Leave a comment

0.0/5