Skip to content Skip to footer

रेशनचा काळाबाजार करणाऱ्यांवर राज्य सरकार करणार कारवाई

रेशनचा काळाबाजार करणाऱ्यांवर राज्य सरकार करणार कारवाई

कोरोनाच्या या कठीण परिस्थितीत देखील काही रेशन दुकानदार काळाबाजार करत असल्याचे निर्देशनास आले होते. अशा रेशन दुकानदारांवर राज्य सरकारने मोठी कारवाई केली आहे. नियमांचं पालन न केलेल्या राज्यातील एकूण 39 रेशन दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 87 रेशन दुकान बंद करण्यात आली आहेत, तर एकूण 48 रेशन दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.

धान्य कमी देणे, सामान्य माणसाकडून अधिकचे पैसे घेणे किंवा धान्य कमी देऊन धान्याचा साठा करणे, असे प्रकार रेशन दुकानदारांकडून चालू होते. या कारवाई नंतर मात्र त्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वितरण व्यवस्था अतिशय महत्त्वाची बनली आहे. अन्न, नागरी पुरवठा विभागाच्यावतीने वितरण व्यवस्थेवर अतिशय सूक्ष्म पद्धतीने लक्ष ठेवले जात आहे.

Leave a comment

0.0/5