Skip to content Skip to footer

मुंबईस्थित कोल्हापूर वासियांना त्यांच्या मूळगावी जाण्याचा मार्ग होणार मोकळा! – कोल्हापूर जिल्हा युवासेना विस्तारक डॉ. श्री. सतीश नरसिंग यांची यशस्वी चर्चा!!

मुंबईस्थित कोल्हापूर वासियांना त्यांच्या मूळगावी जाण्याचा मार्ग होणार मोकळा! – कोल्हापूर जिल्हा युवासेना विस्तारक डॉ. श्री. सतीश नरसिंग यांची यशस्वी चर्चा!!

संपूर्ण जगासह महाराष्ट्र सुद्धा कोरोना महामारीविरुद्ध एकदिलाने लढत आहे. अशावेळी लॉकडाऊनमुळे नोकरी धंद्यानिमित्त मुंबई, ठाणे सह उपनगरात मोठ्या संख्येने वास्तव्यास असलेले कोल्हापूर वासीय अडकून पडले आहेत. इतक्या दिवसांचा लॉकडाऊन त्यातच बरीचशी मंडळी खोली(बॅचलर रूम)मध्ये राहत असल्याने सद्यस्थितीत त्यांच्या खाण्यापिण्याचे खूप हाल होताना दिसत आहे. तसेच कामधंदे बंद असल्याने आर्थिक संकटाचा सामना देखील त्यांना करावा लागत आहे

ही सत्य परस्थिती कोल्हापूर जिल्हा रहिवासी शिवशाहू प्रतिष्ठान मुंबईचे सचिव श्री. कृष्णा पाटील यांनी निवेदनाद्वारे तसेच, कोल्हापूर जिल्हा फेडरेशनचे मुख्य संघटक श्री. विठ्ठल घेवडे यांच्याकडून कोल्हापूर जिल्हा युवासेना विस्तारक, शिवशाहू प्रतिष्ठान, मुंबई सल्लागार डॉ. सतीश नरसिंग यांच्या कानी जाताच अतिशय सवेंदनशिलतेने डॉ. सतीश नरसिंग यांनी सोमवार दि. ५ मे २०२० रोजी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट घेऊन सदर अडचणी त्यांच्या कानी घातल्या. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या या लोकांना खाजगी प्रवासी बस वाहतूकदारांनी केलेली मनमानी भाडेवाढ परवडणारी नसून परिवहन मंडळाकडून माफक दरात किंवा विनामूल्य एसटी प्रवास वाहतूक सेवा उपलब्ध करून त्यांना त्यांच्या मूळ गावी सोडण्याची विनंती केली. या विषयावर उभयतांमध्ये खूपच सकारात्मक चर्चा झाली.

काल दिनांक ६ मे २०२० रोजी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार श्री विजयजी वड्डेट्टीवार यांनी देखील महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाला आवश्यक निधी देण्याचे आश्वासन दिले आहे व येणाऱ्या चार-पाच दिवसात अडकलेल्या मुंबईस्थित कोल्हापूर वासियांना शासनच्या नियमांचे काटेकोर पालन करून एसटीद्वारे माफक दरात तसेच विनामूल्य आपल्या मूळगावी सोडण्यास शासन वचनबद्ध असल्याचे सांगितले.

या महत्वपूर्ण निर्णयाबद्दल महाराष्ट्र राज्याचे सन्मानीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, परिवहन मंत्री अनिल परब, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांचे आभार मानत या निर्णयाच्या यशस्वी मध्यस्तीबद्दल कोल्हापूर जिल्हा युवासेना विस्तारक डॉ. सतीश नरसिंग यांचे समस्त कोल्हापूर वासियांनी मनापासून आभार मानले.

Leave a comment

0.0/5