Skip to content Skip to footer

तीवरे धरणग्रस्तांच्या मदतीला धावून आले बाप्पा…..!

तीवरे धरणग्रस्तांच्या मदतीला धावून आले बाप्पा…..!

रत्नागिरीमधील तीवरे धरण ग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मुंबईच्या प्रभादेवी येथील श्री. सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टच्यावतीने रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे ५ कोटी रुपयांचा धनादेश पालकमंत्री अनिल परब, खासदार विनायक राउत यांच्याकडे सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी सुपूर्द केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार सिद्धिविनायक ट्रस्टच्या विश्वस्तांच्या बैठकीत हा निधी देण्याचा निर्णय झाला होता. या निर्णयाप्रमाणे महाराष्ट्र शासन अध्यादेशानुसार ५ कोटी रूपयांचा धनादेश ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्या हस्ते जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राउत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

यावेळी सिद्धिविनायक ट्रस्टचे कोषाध्यक्ष सुमंत घैसास, विश्वस्त संजय सावंत, गोपाळ दळवी उपस्थित होते.

Leave a comment

0.0/5