Skip to content Skip to footer

उद्योगांना प्रोत्साहन द्यायला सुरुवात ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

उद्योगांना प्रोत्साहन द्यायला सुरुवात ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

वैश्विक महामारी कोरोनाचे संकट सुरु असताना देखील आम्ही नुकतेच १६ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार १२ मोठ्या कंपन्यांसमवेत केले. यामुळे १४ हजार लोकांना रोजगारही मिळणार आहे. या उद्योगांत चीन, अमेरिका, दक्षिण कोरिया, सिंगापूर अशा देशांचा समावेश आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, महाराष्ट्राने गेल्या काही दिवसांत राज्यभर सुमारे ३ लाख बेड्सची सुविधा निर्माण केली आहे. तसेच फिल्ड हॉस्पिटल्सही उभारले आहेत. यावेळी त्यांनी आज लोकार्पण झालेल्या बीकेसी मैदानावरील दुसऱ्या टप्प्यातील रुग्णालयाचे तसेच नेसको येथील कोविड रुग्णालयाचे छायाचित्रेही पंतप्रधानांना दाखवले.

‘चेस दि व्हायरस’ ला संपूर्ण प्राधान्य दिले असून, चाचण्या करणे आणि व्यक्तींचे संपर्क शोधणे वाढविले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. यामुळे धारावीसारख्या भागातही आम्ही संक्रमण रोखल्याचे ते म्हणाले.

Leave a comment

0.0/5