कोरोनाच्या संकटात कृषी मंत्र्यांचा राज्यभर दौरा – शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन साधत आहेत संवाद.
सध्या एकीकडे कोरोनाचे संकट वाढत असल्यामुळे शेतकऱ्याच्या चिंतेत अधिकच भर पडलेली आहे. मागील दोन महिन्यापासून राज्यात लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे सामान्य नागरिकांबरोबर शेतकरी वर्ग सुद्धा भरडला जात आहे. याच पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे बी-बियाणे आणि खतांचाही काळाबाजार चालू झाला आहे. हाच काळाबाजार रोखण्यासाठी आणि बळीराजाला दिलासा देण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे कोरोनाच्या संकटात सुद्धा राज्यभर दौरा करत परिस्थितीचा आढावा घेत आहे.
एकीकडे कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे राज्यातील तीन – तीन मंत्र्यांना कोरोनाची लागन झालेली असताना स्वतःच्या तब्येतीची कसलीही चिंता न करता मंत्री दादा भुसे राज्यभर दौरा करत शेतकऱ्यांना दिलासा देत आहे.
दोनच दिवसापूर्वी कृषिमंत्री भुसे यांनी औरंगाबाद येथे एका बी-बियाणे आणि खतांचा काळाबाजार करणाऱ्या एका फ़र्टीलयझर कंपनीचा काळाबाजार उगडीस आणला होता. तसेच त्वरित कारवाही करत सदर दुकानाचा परवाना रद्द करण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या या कार्याचे सर्व राज्यभर कौतुक होताना दिसत आहे.
आज कोरोनाच्या संसर्गाने हौदोस घातलेला असताना फक्त बळीराजाचे अश्रू पुसण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून राज्यभर दौरा करत मंत्री भुसे शेतकरयांना आधार देण्याचे काम करत आहे. आजच नाही तर मंत्री पदाची सूत्र हातात घेतल्यापासून दादा भुसेंनी आपल्या कामाला सुरवात केली आहे.