Skip to content Skip to footer

व्यवसाय अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द, ठाकरे सरकारचा निर्णय !

व्यवसाय अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द, ठाकरे सरकारचा निर्णय !

राज्यातील विशेष करून मुंबईतील कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी ठाकरे सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारने व्यवसायिक/बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या शेवटच्या वर्षाच्या/शेवटच्या सेमिस्टरच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अद्याप कोणतीही परीक्षा किंवा वर्ग घेण्यास अनुकूल नसल्याने बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांची अंतिम वर्षाची परीक्षा न घेण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून एका ट्विटद्वारे देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. तसेच यामध्ये त्यांनी एआयईसीटीई, सीओए, पीसीआय, बीसीआय, एनसीटीई आणि नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजीलाही राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयाला मंजुरी देण्याची विनंती पत्राद्वारे केली आहे.

Leave a comment

0.0/5